Psalms 120

1माझ्या संकटात मी परमेश्वराकडे मोठ्याने ओरडलो
आणि त्याने मला उत्तर दिले.
2हे परमेश्वरा, जे कोणी आपल्या ओठाने खोटे बोलतात
आणि आपल्या जिभेने फसवतात त्यापासून माझा जीव सोडीव.

3हे कपटी जिभे, तुला काय दिले जाईल

आणि आणखी तुला काय मिळणार?
4तो योद्ध्याच्या धारदार बाणांनी,
रतम लाकडाच्या जळत्या निखाऱ्यावर बाणाचे टोक तापवून तुला मारील.

5मला हायहाय कारण मी तात्पुरता मेशेखात राहतो,

मी पूर्वी केदारच्या तंबूमध्ये राहत होतो.
6शांतीचा तिरस्कार करणाऱ्यांबरोबर
मी खूप काळ राहिलो आहे.
मी शांतीप्रिय माणूस आहे, असे जेव्हा मी बोलतो
पण तेव्हा ते युध्दासाठी तयार होतात.
7

Copyright information for MarULB